Garbage Segregation
sakal
नाशिक: केंद्र सरकारने जीएसटी दर कमी केल्याचा आनंद साजरा होत असतानाच दुसरीकडे महापालिकेच्या घनकचरा विभागाने कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिक व व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ सप्टेंबरपासून दंडात्मक कारवाई सुरु होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या १०मध्ये येण्यासाठी दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची जोड दिली जात आहे.