Kadwa Sugar Cooperative Annual General Meeting
sakal
लखमापूर: सातत्याने ऊस उत्पादकांचे हित जपत, त्यांना चांगला दर देण्याची परंपरा कादवा सहकारी साखर कारखान्याने जोपासली आहे. कारखान्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, तसेच आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे एकरी उत्पादन वाढवावे आणि ऊस केवळ कादवालाच पुरवठा करावा, असे आवाहन कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.