राज्‍य बुद्धिबळ संघात नाशिकचा कैवल्य नागरे

chess
chessesakal
Updated on

नाशिक : जिल्हा चेस असोसिएशनतर्फे राज्‍याच्‍या संघ निवडीसाठी दोनदिवसीय खुली व महिला बुद्धिबळ स्पर्धा झाली. २५ फेब्रुवारीला भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ स्‍पर्धेतून निवडण्यात आला. या संघात कैवल्‍य नागरेचा समावेश आहे.

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे राज्‍यस्‍तरीय बुद्धिबळ स्पर्धा झाली. या स्पर्धेतून पुरुष गटातून विजयी ठरलेले सुयोग वाघ (नगर), कैवल्य नागरे (नाशिक), पुष्कर डेरे (मुंबई), आदित्य सावळंकर (कोल्हापूर) यांची राज्‍य संघात निवड झाली. महिला गटातून विजयी ठरलेल्या वृषाली देवधर (मुंबई), भाग्यश्री पाटील (जळगाव), अभा गावकर (पालघर), नीती गुप्ता (मुंबई) बुद्धिबळपटू राष्ट्रीय स्‍पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. तसेच या स्पर्धेत जलद बुद्धिबळ स्पर्धा खेळविण्यात आली. भरीव कामगिरी करणाऱ्या ११ महिला आणि ११ पुरुष बुद्धिबळपटूंना रोख बक्षिसे दिली.

chess
रोहितचा मोठेपणा! स्वत: माघार घेत युवा पोरांना दिली संधी

पंचवटीतील इंद्रकुंड येथील दादा जेठानंद पागरानी ट्रस्टच्या सभागृहात स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. माजी महापौर अशोक मुर्तडक, फिडे मास्टर सजनदास जोशी, संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, डॉ. राजेंद्र सोनवणे यांचा हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. जयराम सोनावणे यांनी सूत्रसंचालन केले. विनायक वाडिले यांनी आभार मानले. स्पर्धेत पंच म्हणून पुणे येथील नितीन शेणवी, नाशिकच्या श्रेया चिटणीस यांनी काम पाहिले. सहाय्यक पंच म्हणून हर्शल वालदे, माधव चव्हाण यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धा यशस्वितेसाठी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव सुनील शर्मा, भूषण पवार, विक्रम मावळंकर, वैभव चव्हाण, माधव चव्हाण, अजिंक्य तरटे, गौरव देशपांडे, डॉ. सचिन व्यवहारे यांनी परिश्रम घेतले. क्रीडाप्रेमींपर्यंत स्पर्धा पोचविण्यासाठी मँट संस्थेच्या मंजूषा डहाळे, अंजली मावळंकर यांनी सहाय्य केले. स्पर्धेतील सर्व डाव मँटच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असल्‍याचे आयोजकांनी कळविले आहे.

chess
काय तुझ्या माहेरची माणसं; भारताचा होणारा जावई मॅक्सवेल चिंतेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com