Nashik Kalaram Temple : नाशिकच्या काळाराम मंदिर संस्थानमध्ये खळबळ; विश्वस्त मंदार जानोरकर यांची पदावरून हकालपट्टी!

Trustee Removal Sparks Controversy at Kalaram Temple : नाशिकचे ग्रामदैवत श्री काळाराम मंदिर. संस्थानच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विश्वस्त मंदार जानोरकर यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला.
Kalaram Temple

Kalaram Temple

sakal 

Updated on

नाशिक: नाशिकचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळात खळबळ उडाली आहे. विश्वस्त मंदार जानोरकर यांना विश्वस्त पदावरून निष्कासित करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. ६) झालेल्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, हा आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न असून याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे जानोरकर यांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com