Naming Ritual : दहेगावात चक्क कालवडीचा नामकरण विधी!

naming ritual
naming ritualesakal

विंचूर (जि. नाशिक) : शेती परवडत नाही म्हणून शेतकरी (Farmer) जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत. त्यामुळे पशुपालन आणि दूधविक्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात कात टाकू बघत आहे.

शेतकऱ्यांकडील ही दुभती जनावरे फक्त पाळीव प्राणी न राहता शेतकऱ्याच्या घरातील सदस्य असल्याच्या चर्चा आपण ऐकत असतो. (Kalavadi Naming Ritual done by farmer nashik news)

अशीच एक घटना सध्या निफाड तालुक्यात चर्चिली जात आहे, ती म्हणजे शेतकऱ्याने केलेला कालवडीचा नामकरण विधी. दहेगाव येथे मंगळवारी (ता. ७) सायंकाळी कालवडीचा नामकरण विधी पार पडला. अनेक पशुपालक शेतकऱ्यांनी या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे स्वागत केले आहे.

दहेगाव येथील अंबादास भवर हे पशुपालक आणि दुग्धव्यवसायिक म्हणून परिसरात प्रसिद्ध आहेत. शेतीस जोडधंदा म्हणून सुरू केलेला दूधविक्री व्यवसाय कालांतराने कुटुंबाचा मुख्य व्यवसाय झाला अन गायी घरातील सदस्य झाल्या.

रुक्मिणी, गीता, सीता, मोनिका, मोठी एकादशी, सुगरण, अशी नावे असलेल्या सहा गायींचे पालन ते करतात. त्यांच्यापासून दिवसाकाठी सत्तर लिटर दुधाची विक्री ते करतात. त्यांच्याकडे असलेली रुक्मिणी नावाची गाय संत निवृत्तीनाथ यात्रेच्या दिवशी एकादशीला (ता. १८) व्याली. एका सुंदर आणि गोंडस कालवडीस गायीने जन्म दिला.

naming ritual
Nashik News : विनापरवाना मद्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई

भवर कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले. धार्मिक वातावरण लाभलेल्या भवर कुटुंबाने या कालवडीचा नामकरण विधी करण्याचा निर्णय घेतला. मुलांचा नामकरण विधी केला तर कालवडीचा का करू नये ? असा विचार भवर यांनी बोलून दाखविला. मंगळवारी (ता.७) हा नामकरण विधी पार पडला.

एकादशीच्या दिवशी जन्म झाला म्हणून कालवडीचे नाव 'एकादशी' ठेवण्यात आले. नामकरण विधीच्या दिवसी उपस्थितांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सुमारे पाचशे नागरिकांनी या कार्यक्रमास हजेरी लावली असल्याचे भवर यांनी सांगितले. जिल्ह्याभरात या आगळ्यावेगळ्या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

naming ritual
Sambhaji Raje : संभाजीराजे छत्रपतींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग!

पशूपालनाला वाढते महत्त्व

निफाड पूर्व भागात शेतकरी पशुपालन आणि दूधविक्री व्यवसाय करत आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा लागवडीस फाटा देऊन अनेक मका पिकाकडे मोर्चा वळविला आहे. जनावरांसाठी चाऱ्याची सोय देखील यातून झाली आहे.

त्यामुळे, उन्हाळ्यात जनावरांचा हिरव्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे चित्र आहे. परिणामी, पशुपालन आणि दूधविक्री मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जनावरांची देखभाल, काळजी, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला आदी मार्गातून पशुपालक सजग राहत आहेत.

"विशेष सोहळा केला असल्याचे आमचे म्हणणे नाही. सर्व दुभती जनावरे भवर कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यांची प्रत्येकाचे नाव असल्याने त्याच नावाने संबोधन असते. दुग्धोत्पादन हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय झाल्याने त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्ही केला."

- अंबादास भवर, शेतकरी, दहेगाव.

naming ritual
Sambhaji Raje : इतिहास, संस्कृती धार्मिक पर्यटनाने नाशिकला महत्त्व : संभाजीराजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com