Market Committee Election Result: कळवणला शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व! 18 पैकी 15 जागा जिंकत सत्ता अबाधित

election
electionesakal

Market Committee Election Result : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागा जिंकत सत्ता अबाधित ठेवत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली.

परिवर्तन पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. (kalavan dominated by shetkari vikas Panel Power intact winning 15 out of 18 seats Market Committee Election Result nashik news)

कळवण बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी शुक्रवारी मतदान होवून ९०.९१ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरवात झाली.

प्रथम सोसायटी गटाची त्यानंतर ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मापारी गटाची मतमोजणी प्रक्रिया पार पाडत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून निकाल घोषित करण्यात आला.

आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे पदाधिकारी निवडणूक रिंगणात उतरले होते. निवडणूक निर्णय अधिकारी चिंतामण भोये यांनी निवडणूक निकाल जाहीर करताच शेतकरी विकास पॅनलच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी निकालाचे स्वागत केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

election
Dindori Market Committee Election: दिंडोरी बाजार समितीत परिवर्तन! शेतकरी उत्कर्ष पॅनलला 5 जागा

विजयी उमेदवार

सोसायटी गट :

बाळासाहेब गांगुर्डे (३०७), सुधाकर खैरनार (३२७), सोमनाथ पवार (२८६), पंढरीनाथ बागूल (२३४ ), दत्तू गायकवाड (२४६), प्रवीण देशमुख (२५८), दिलीप कुवर (२७७) विजयी झाले.

महिला राखीव गटातून शेतकरी सुनीता जाधव (३११), रेखा गायकवाड (२७४) विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय गटातून बाजार समितीचे माजी सभापती धनंजय पवार (२९५), भटक्या विमुक्त जमाती गटातून बाळासाहेब वराडे (२९४ ) विजयी झाले.

ग्रामपंचायत गट :

सर्वसाधारण गटातून पाळे खुर्दचे उपसरपंच भरत पाटील (३६२) चणकापूरचे सरपंच ज्ञानदेव पवार (३९०) विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती गटातून पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत गवळी (४१५) विजयी झाले.

आर्थिक दुर्बल गटातून बाजार समितीचे माजी संचालक शीतलकुमार अहिरे (३७५) विजयी झाले. व्यापारी गटाची निवड प्रक्रिया माघारीमुळे बिनविरोध झाली होती.

कळवण मर्चंट बँकेचे अध्यक्ष योगेश महाजन (२५३), योगेश शिंदे (२४३) विजयी झाले. हमाल मापारी गटातून शशिकांत पवार हे अटीतटीच्या लढतीत ( ६३ ) १८ मतांनी विजयी झाले.

election
Ghoti Market Committee Election Result : घोटीत शेतकरी विकास पॅनलची सत्ता! परिवर्तन पॅनलला 2 जागा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com