Kalika Mata Mandir
sakal
नाशिक: दोन दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी (ता. २४) उघडीप दिल्याने ग्रामदैवत कालिका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून मोठी गर्दी उसळली होती. पहिल्या माळेपासून मंदिराच्या आवारात सुरू असलेल्या जागरण गोंधळाची भाविकांना भुरळ पडत आहे. दरम्यान, यात्रेनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला तिसऱ्या माळेलाही मोठा प्रतिसाद मिळाला.