Kalika Mata Temple
sakal
नाशिक: श्री कालिका देवी संस्थानतर्फे गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची विजयादशमीने सांगता होत आहे. विश्वस्तांच्या हस्ते देवीची महापूजा, शस्त्रपूजन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या माळेचे औचित्य साधत बुधवारी (ता. १) हजारो भाविकांची भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती.