Shri Kalika Devi Temple
sakal
नाशिक: ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात येत्या सोमवार (ता. २२)पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्र व इतर जिल्ह्यांतून हजारो भाविक देवीदर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून, भाविकांना सुखकर दर्शनाचा लाभ व्हावा, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील यांनी दिली.