Kalika Devi Yatra
sakal
नाशिक: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने श्री कालिकाभक्तांच्या उत्साहावर पाणी फेरले. परंतू रविवारी सायंकाळनंतर काहीकाळ पावसाने उघडीप दिल्याने सुटीचे औचित्य साधत ग्रामदैवताच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. दरम्यान, यात्रोत्सवातील सात दिवसांपैकी चार दिवस मुसळधार पावसातच वाहून गेल्याने हे नुकसान पुढील चार दिवसांत कसे भरून येणार असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.