Yatra
sakal
नाशिक: दोन आठवड्यांनी सुरू होणाऱ्या नाशिकच्या ग्रामदैवत कालिका मातेच्या यात्रोत्सवानिमित्त मुंबई नाका परिसरात लावल्या जाणाऱ्या खेळणी, रहाट पाळण्यासाठी लिलाव प्रक्रिया सुरू झाली असतानाच प्रशासकीय कारणास्तव लिलाव तहकूब करण्याचा निर्णय पश्चिम विभागीय अधिकाऱ्यांनी घेतला. विशेष म्हणजे लिलाव प्रक्रियेत भाग घेतलेल्या भागधारकांना अनामत रक्कम परत घेऊन जाण्याच्या सूचना दिल्याने शहरातील एका आमदाराच्या कार्यकर्त्याला रहाट पाळण्याचे कंत्राट देण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याची चर्चा आहे.