Kalika Mata Mandir
sakal
नाशिक: शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका नवरात्रोत्सवास मंगलमय वातावरणात भाविकांच्या हजेरीत मोठ्या उत्साहात सुरवात झाली. पहाटे पाच वाजता ट्रस्टच्या विश्वस्तांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने विधिवत घटस्थापना करण्यात आली. यानंतर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते देवीचा अभिषेक झाला. सकाळी मंगलमय वातावरणात ढोलताशांच्या गजरात आणि सनई चौघड्याच्या निनादात नवरात्र महोत्सवाचे ध्वजारोहण झाले.