पंचवटी- नाशिक बाजार समितीच्या शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथे प्रशासकीय इमारतीसाठी पुरेसे काम झालेले नसतानाही माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी मनमानी करीत ठेकेदाराला एक कोटी ४५ लाख रुपयांची आगाऊ रक्कम दिली. पंचवटी व शरदचंद्र पवार मार्केट यार्डात गटारीचे ढापे दुरुस्ती काम निकृष्ट दर्जाचे करून ठेकेदाराला ५३ लाख ६० हजार रुपये देण्यात आले.