Toxic Chemical Released in Kalwan Farms : भादवण परिसरात शेतात विषारी केमिकल टाकणाऱ्या टँकरला शेतकऱ्यांनी पकडले. चालक व क्लीनरला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
कळवण- कळवण तालुक्यातील भादवन परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात सोमवारी (ता. २१) पहाटे चारच्या सुमारास रासायनिक विषारी द्रव्य सोडण्याचा प्रकार उघडकीस आला. स्थानिक शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून कळवण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.