कळवण: सार्वजनिक बांधकाम विभागाने मुदतीत विकासकामे पूर्ण करून घेतली. मात्र मुदतीत साडेपाचशे कोटी रुपयांची देयके दिली नसल्याने कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या भावना शासनाला कळवा, पंधरा दिवसांत प्रलंबित देयके द्या; अन्यथा बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया मालेगाव सेंटरचे संस्थापक रमेश शिरसाठ यांनी कंत्राटदारांच्या ठिय्या आंदोलनप्रसंगी दिला.