Kalwan Bribery Case : कळवण भूमिअभिलेख कार्यालयात 'एसीबी'चा दणका; १५ हजारांची लाच घेताना भूमापक गजाआड!

Nashik ACB Arrests Land Survey Clerk in Kalwan : कळवण भूमिअभिलेख कार्यालयातील भूमापक सागर वानखेडे आणि मध्यस्थ मुकेश पगार यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.
Bribery Case

Bribery Case

sakal 

Updated on

कळवण: येथील भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत भूमापक लिपिक सागर बापू वानखेडे (वय ३६) याला १५ हजारांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. या प्रकरणात वानखेडेसह लाच स्वीकारण्यासाठी मध्यस्थी करणारा खासगी व्यक्ती मुकेश पगारलाही अटक करण्यात आली. विशेष म्हणजे सहा महिन्यांत कळवण भूमिअभिलेख कार्यालयातील हा दुसरा लाचखोर जाळ्यात सापडल्याने तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com