attle disease
sakal
कळवण: रवळजी परिसरात लाळ-खुरकत साथीने अक्षरशः थैमान घातले आहे. गोठ्यांतील गायी-म्हशींच्या तोंडातून लाळ गळणे, ताप, चारा न खाणे अशी लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसत असून, शेतकरी हतबल झाले आहेत. दूध उत्पादन कोसळत असल्याने जनावरांच्या संवर्धन विभागावर तातडीने लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी संतप्त सुरात केली जात आहे.