कळवण- कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात पूर्ण वेळ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतात. रुग्णांना अन्य रुग्णालयात रेफर केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार आमदार नितीन पवार यांनी रुग्णालयाला भेट देत, ग्रामीण व आदिवासी रुग्णांची हेळसांड करू नका असे आवाहन केले.