Nitin Pawar
sakal
कळवण: येथील उपजिल्हा रुग्णालय सध्या समस्येच्या गर्तेत असून, वैद्यकीय यंत्रणा रुग्णांना वेळेवर सेवा देत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाट पाहत रुग्णांना तासन्तास थांबावे लागत आहे. यंत्रणेवर वरिष्ठांचा अंकुश नसल्याने मनमानी वाढली आहे.