नाशिक: आदिवासी आयुक्तालयासमोरील बिऱ्हाड आंदोलनाला एक महिना पूर्ण होत असताना त्याचे पडसाद आता ग्रामीण भागात उमटू लागले आहेत. कळवण व सुरगाणा तालुक्यांतील तब्बल १५ शासकीय आश्रमशाळा विद्यार्थ्यांअभावी बंद झाल्या. येथील साडेहजार विद्यार्थी सद्यस्थितीला ‘शाळाबाह्य’ झाले असून, ऑगस्टमधील पहिल्या घटक चाचणीवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.