Farmer Protest
sakal
कळवण: कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, शुक्रवारी (दि. १२) संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातून कांद्याचे ट्रॅक्टर थेट कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयात आणून शासनाचा निषेध केला. प्रशासकीय कार्यालयाच्या आवारातच कांद्याचा लिलाव करण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी लावून धरली. अखेर, तब्बल पाच तास चाललेल्या आंदोलनानंतर प्रशासकीय कार्यालयाच्या आवारातच कांद्याचा लिलाव करण्यात आला.