
Kamgar Kalyan Natya Spardha : मनातील कल्पनेचा नाट्याविष्कार ‘चेटूकवारं’
नाशिक : विल्यम शेक्सपियरचे मुळ नाटक ‘द टेम्पेस्ट’ या नाटकाचे प्रा. दिलीप जगताप यांनी मराठीत भाषांतरित केलेले नाट्य म्हणजे ‘चेटूकवारं’. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८ व्या नाट्यस्पर्धेत रविवारी (ता. २२) ललित कला भवन, सिडकोतर्फे हे नाटक सादर झाले. (Kamgar Kalyan Natya Spardha dramatization of minds imagination play Chutkwara nashik news)
राजेश टाकेकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले. राज्य बळकावण्याच्या ईर्षेतून कुटुंबातील सदस्यांचा छळ करणे आणि स्वतःच अस्तित्व तयार करणे असे या नाटकाचे कथानक आहे. जय शुक्ल, डॉ. सोनाली गायकवाड, वैष्णवी ताम्हनकर, ऋषिकेश रोटे, रवींद्र ढवळे, विवेकानंद भट, अरुण भावसार, प्रबुद्ध माघाडे, सचिन दलाल, लक्ष्मीकांत पवार, हरिकृष्ण डिडवाणी, ओम शेवाळे, योगेश कुलवदे, मुरलीधर जगताप,
संजय साळवे, केदार रत्नपारखी, राजेश टाकेकर, हरीश परदेशी, संदीप गांगुर्डे, रमेश देशमुख, पोपट देवरे, रवी सोनवणे, प्रेमसिंग गिरासे, शशी वराडे, संजय दशपुते या कलावंतानी या नाटकात भूमिका साकारल्या.
हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
हेही वाचा: Education News : RTEसाठी शाळांची नोंदणी सुरू होणार; प्रवेशाच्या वेळापत्रकाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
नेपथ्य चंद्रकांत जाडकर तर विनोद राठोड यांनी प्रकाशयोजना साकारली. विक्रम गवांदे यांनी नाटकाला पार्श्वसंगीत दिले. रंगभूषा माणिक कानडे, तर वेशभूषा हरिकृष्ण डिडवाणी यांनी साकारली. रवींद्र ढवळे, नंदकुमार देशपांडे यांनी निर्मिती प्रमुख म्हणून काम पाहिले.
आजचे नाटक
स्पर्धेत सोमवारी (ता. २३) कामगार कल्याण केंद्र, नेहरूनगरतर्फे 'विठ्ठला' हे नाटक सादर होणार आहे. विजय तेंडुलकर या नाटकाचे लेखक असून राजेश शर्मा दिग्दर्शक आहेत.
हेही वाचा: Saptsrungi Devi Gad : सप्तशृंगगडावरील ऐतिहासिक कुंडांच्या पुन्नरुज्जवीनास सुरवात