Kamgar Kalyan Natya Spardha : अबसर्ड प्रकारातील नाट्यकृती ‘क्रकचबंध’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

W. Sa. Theater: At one point in the play 'Krakchabandh,

Kamgar Kalyan Natya Spardha : अबसर्ड प्रकारातील नाट्यकृती ‘क्रकचबंध’

नाशिक : अबसर्ड नाट्य प्रकाराकडे झुकणारी नाट्यकृती ‘क्रकचबंध’. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८ व्या नाट्य स्पर्धे गुरुवारी (ता. १२) कामगार कल्याण केंद्र, ओझरतर्फे हे नाटक सादर झाले. शिरीष जोशी लिखित या नाटकाचे दिग्दर्शन दीपक टावरे यांनी केले.

मुळात नरकात घडणारे हे नाटक आजच्या पृथ्वीवरील जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करते. नाटकातील पात्र शशांक पेशाने पत्रकार, जिवंतपणी धूर्त, छक्के पंजे खेळणारा आणि आपण खूप शूर आहोत अशा वल्गना करणारे आहे. त्याचा मृत्यू गृह युद्धाला घाबरून परदेशात पलायन करत असताना सीमेवरील सैनिकांकडून घडतो. (Kamgar Kalyan Natya Spardha Karkach Bandh drama in absurd genre Nashik News)

हेही वाचा: Nashik News : गंगापूर कॅनॉल मध्ये आढळला दुचाकी सह संशयास्पद मृतदेह

अत्यंत निर्दयपणे आयुष्यभर बायकोचा छळ केल्याने तो नरकात येतो. मात्र, तेथेही तो आपल्या पृथ्वीवरील स्वभाव सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. यासह सूरज हा कारकून असून त्याने अतिशय क्रूरपणे पद्धतीने आपल्या प्रेयसीच्या पतीचा खून केल्याने त्याला नरकाची प्राप्ती होते. निशा ही चंचल आणि कामुक तरुणी पैसा व मिळवण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकते.

आपल्या सावत्र बाळाचा निर्दयी खून केल्याने नरकात येते. हे तिघेही क्रकचबंधात अडकतात आणि त्यातून मुक्त होण्याचा त्यांचा प्रयत्न करतात. त्यांच्या या संपूर्ण प्रवासाचे वर्णन या नाट्यकृतीतून दिसून येते. संदेश सावंत, दीपक टावरे, सुमन शर्मा, शंकर वाघमारे, भरत जाधव या कलावंतांनी या नाटकात भूमिका साकारल्या.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

हेही वाचा: Nashik Accident News : सिन्नर शिर्डी महामार्गावर बस व ट्रक ची धडक झाल्याने भिषण अपघात

मिलिंद मेधने, पराग अमृतकर यांनी नाटकाचे नेपथ्य साकारले. जयदीप पवार, प्रवीण मोकाशी यांनी प्रकाशयोजना, तर तेजस बिल्दीकर यांनी संगीत दिले. माणिक कानडे, विद्या भालेराव, निर्मला साळवे यांनी रंगभूषा, तर लीना सोनार, राखी लढ्ढा, शीतल परमाळे, मृणाल गीते यांनी वेशभूषा साकारल्या. दीनानाथ प्रजापती, गणेश ननावरे, भारत मधाळे, सुरेश शिंदे, महेश बोरसे, दीपक ढोली, रवींद्र शिंदे, अशोक सोनवणे, धनश्री भार्गवे, माधवी देवघरे यांनी रंगमंच साहाय्य केले. कुणाल खरे यांनी सूत्रधार म्हणून काम पाहिले.

आजचे नाटक

स्पर्धेत शुक्रवारी (ता. १३) कामगार कल्याण केंद्र, सिन्नरतर्फे फ्रेंडशिप नाटक सादर होणार आहे. राजेंद्र पोळ या नाटकाचे लेखक असून विक्रम गवांदे दिग्दर्शक आहेत.

हेही वाचा: Nashik News : महा-ई-सेवा केंद्राचा परवाना वर्षासाठी रद्द