Kamgar Kalyan Natya Spardha : यंदा 24 नाटकांची रसिकांनी मेजवानी! तिसरी घंटा वाजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actors performing scenes from the play 'Final Draft' at the drama festival organized by Kamgar Kalyan Mandal.

Kamgar Kalyan Natya Spardha : यंदा 24 नाटकांची रसिकांनी मेजवानी! तिसरी घंटा वाजली

नाशिक : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या ६८ व्या नाशिक विभागीय नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन बुधवारी (ता.२८) करन्सी नोट प्रेसचे जनरल मॅनेजर बोलेवार बाबू, मराठी चित्रपट निर्माता संजय पाटील, आचार्य नागेश वैद्य, कामगार कल्याण मंडळाच्या भावना बच्छाव यांच्या हस्ते झाले. यंदा या स्पर्धेत रसिकांना २४ विविधांगी नाटकांची मेजवानी मिळणार आहे. (Kamgar Kalyan Natya Spardha This year 24 dramas feasted by fans nashik news)

महाराष्ट्रातील नाट्य कलावंतांमध्ये सादरीकरणाची विलक्षण क्षमता आहे, मात्र त्यांना नाटक उभं करण्यासाठी निर्माता भेटत नाही असे प्रतिपादन मराठी चित्रपट निर्माता संजय पाटील यांनी केले. नाटकांना आॅडिअन्स मिळाला तर निर्माता सहज प्राप्त होईल असे बोलेवार बाबू यांनी सांगितले.

यंदा या स्पर्धेत २४ नाटकांचे सादरीकरण होणार असल्याने कामगार कल्याण नाट्यस्पर्धा ही नाट्यरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. रवींद्र कराटे, सतीश कोठेकर, रूपाली देशपांडे हे या नाटकांचे परिक्षण करणार आहेत. शशिकांत पोटोळे यांनी सूत्रसंचालन केले. भावना बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र नांद्रे यांनी आभार मानले.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Devendra Fadanvis | निरीक्षक देशमुख यांची अतिरिक्त पोलिस महासंचालकातर्फे चौकशी : फडणवीस

कामगार वसाहत, सातपूरतर्फे ‘फायनल ड्राफ्ट’ हे नाटक सादर करण्यात आले. गिरीश जोशी लिखित गुरु- शिष्याच्या अनामिक नात्याचा शोध घेणाऱ्या या नाट्यकृतीने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. राजेश शर्मा यांनी दिग्दर्शन केले. माधुरी पाटील, राजेश शर्मा आणि विश्‍वास गडाख या कलावंतांनी भूमिका साकारल्या.

नेपथ्य शैलेंद्र गौतम तर प्रकाश योजना विनोद राठोड यांनी साकारली. वेशभूषा सुरेखा लहामगे शर्मा यांनी तर रंगभूषा माणिक कानडे यांनी सांभाळली. शुभम शर्मा यांनी रंगमंच व्यवस्था हाताळली. राजा पाटेकर यांनी नाटकाचे निर्मिती सूत्रधार म्हणून काम पाहिले. मधुरा तरटे यांनी संगीत संयोजन केले.

आजचे नाटक

स्पर्धेत गुरुवारी (ता. २९) कामगार कल्याण केंद्र दीपनगर- भुसावळतर्फे ‘फक्त चहा’ हे नाटक सादर होणार आहे. आकाश बाविस्कर हे या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

हेही वाचा: Nashik News: ‘सावाना’ च्या 1 लाख 42 हजार पुस्तकांच्या सूची लिंकचे प्रभावळकरांच्या हस्ते लोकार्पण!