Kanchan Tarle
sakal
चांदोरी: ''स्वप्ने मोठी असावीत, कारण प्रयत्न आपोआप मोठे होतात’ ही ओळ येथील कांचन हिरामण टर्ले हिच्याबद्दल तंतोतंत लागू होतात. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य कर निरीक्षक पदावर निवड होऊन गावाचे नाव उजळवणारी ही तरुणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता एमपीएससीच्या वर्ग-१ पदाच्या परीक्षेत यश मिळवत कांचनने आपल्या मेहनतीचा नवा इतिहास रचला आहे.