
Nashik News : कानडी मळा, ऐश्वर्या गार्डन परिसराचा कायापालट!
सिन्नर (जि. नाशिक) : नगर परिषदेच्या कानडी मळा भागातील मैला व्यवस्थापन केंद्रातील खडकाळ जमिनीवर महिला बचत गटाच्या माध्यमातून वनराई फुलली असून, येथे तयार झालेले सुंदर उद्यान सर्वांच्याच मनात घर करत आहे.
यामुळे बचत गटाच्या सहा महिलांना हक्काचा रोजगार मिळाला असून, या सुंदर मॉडेलची राज्य शासनाकडूनही दखल घेण्यात आली आहे.
तर दुसरा प्रकल्प ऐश्वर्या गार्डन येथे ४० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया, महिला बचत गटाने फुलवला बगीचा सोलर उर्जेवर चालवले शुद्धीकरण केंद्र सांडपाण्यावर जलशुद्धीकरण केंद्र राबवणारी पहिली नगर परिषद असे दोन प्रकल्प प्रस्थापित करून सिन्नर नगर परिषदेने सिन्नरच्या मानत शिरपेच्यात मानाचा तोरा रोवला आहे, तर हक्काचा रोजगार अनेक महिला बचत गटांना मिळाल्याचे असल्याने महिलांचे सबलीकरणास एक अर्थाने मदत झाली आहे. (Kandi Mala Aishwarya Garden area transformation Success to efforts of women in Sinnar Nagar Parishad officers employees self help groups)
स्वयंरोजगारासाठी नगर परिषदेकडून दहा हजारांच्या निधीसह बँकेकडून अल्प व्याजदरावर कर्ज मिळत असल्याने या महिला आपल्या पायावर उभ्या राहत आहेत. त्यातील एक बचतगट म्हणजे केशवा बचत गट.
या बचत गटातील सहा महिलांनी पूर्ण शहराचा मैला जमा होणाऱ्या ठिकाणी काम करत तेथील प्रकल्पाला विलोभनीय सौंदर्य प्राप्त करून दिले आहे. तर दुसरा प्रकल्प म्हणजे ४० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून इच्छापूर्ती महिला बचत गटाच्या सदस्यांनी बगीचा फुलवून सरस्वती नदीचे प्रदूषण कमी करून सोलर उर्जेवर शुद्धीकरण केंद्र चालवले आहे.
गटारीच्या पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्र केले आहे. यासाठी बचत गटाने सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत स्वच्छता केली आहे.. बघता बघता काही दिवसांतच येथील खडकाळ जमिनीवर वनराई फुलू लागली.
यानंतर नगर परिषदेच्या मागदर्शनाखाली येथे बगीचा तयार करण्यास सुरवात करत खडकाळ जमिनीवर वनराई फुलवण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. आज येथील बगीच्यात वेगवेगळ्या जातीची फुले, फळांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. सिन्नरकरांचा मैला ज्या ठिकाणी जमा होतो त्याठिकाणी आज महिलांनी सर्वत्र सुगंध दरवळवला आहे.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
यासाठी महिलांना मुख्याधिकारी संजय केंदार, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, आरोग्य विभागाचे निरीक्षक रवींद्र देशमुख आदींचे मार्गदर्शन लाभले.
ऐश्वर्या गार्डन येथील दुसऱ्या प्रकल्पात सीईपीटी विद्यापीठाच्या सहाय्याने पुढचे पाऊल म्हणून नदी प्रदूषित होण्यापासून वाचवावी याकरिता पथदर्शी प्रकल्प म्हणून नगरपरिषदेने रामनगरी या उपनगरातून वाहून येणारे सांडपाणी ऐश्वर्या गार्डन जवळ ६० हजार लिटर क्षमतेच्या टाकीत अडविले. सद्यःस्थितीत रोज ४० हजार लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे.
प्रकल्प पूर्णपणे सोलर उर्जेवर
प्रकल्पात रोज ४० हजार लिटर सांडपाणी जमा होते. वीजपंपाद्वारे पाणी प्रकल्पात आल्याबरोबर प्रथम ऑइल, ग्रीस, तेलकटपणा काढला जातो. दुसऱ्या साठवण टाकीत पाण्यातील गाळ, खडे, घाण बाजूला केली जाते.
हवेच्या दाबाने पाण्याचा वास घालवला जातो. तिसऱ्या टाकीत तयार झालेल्या बॅक्टेरियांमुळे पाणी अधिक शुद्ध होते. हे पाणी वाळूच्या फिल्टरमध्ये सोडून अधिक स्वच्छ केले जाते. अखेरीस क्लोरीन वायू पाण्यात सोडून शुद्ध पाणी उपलब्ध होते. हा प्रकल्प संपूर्णपणे सोलर उर्जेवर सुरू आहे.