नाशिक: पहिल्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत ‘बम, बम भोले’च्या गजरात भल्या पहाटेपासून कपालेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी लोटली होती. रात्री उशिरापर्यंत हजारो शिवभक्तांनी श्री कपालेश्वरासह सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. दुपारी निघालेल्या कपालेश्वराच्या पालखी सोहळ्याचे स्वागत सडा रांगोळीने करण्यात आले. सोमेश्वरलाही दिवसभर गर्दी होती.