नाशिक: लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कपालेश्वर संस्थानच्या घटनानिर्मितीस तब्बल २१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुहूर्त लागला आहे. कपालेश्वर न्यासाची योजना तयार करण्यास आणि तात्पुरत्या स्वरूपात विश्वस्त निवडीचे अधिकार जिल्हा न्यायालयाला देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने संमती दिली आहे. या निर्णयाचे स्वागत बरखास्त विश्वस्त मंडळाने केले असून, याचिकाकर्त्यांनी मात्र संपूर्ण निकाल अभ्यासल्यावरच पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले.