नाशिक- शहरातील प्राचीन श्री कपालेश्वर महादेव देवस्थानातर्फे महाशिवरात्रीला बुधवारी (ता.२६) भाविकांना केवळ १५ मिनिटांत दर्शन होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेत महिला व पुरुषांच्या स्वतंत्र दर्शनरांगा असतील. दरम्यान, महाशिवरात्रीसाठी मंदिरावर आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट करण्यात येईल. याशिवाय, महाशिवरात्रीनिमित्त कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली.