SAKAL IMPACT : करंजाड- नामपूर चक्री बस सुरू

बस गावात पोहचताच ग्रामस्थांकडून चालक, वाहकाचे औक्षण करून केले स्वागत
बस गावात पोहचताच ग्रामस्थांकडून चालक, वाहकाचे औक्षण करून केले स्वागत esakal

अंबासन (जि. नाशिक) : शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून ग्रामीण भागातील करंजाड- नामपूर चक्री बससेवा सुरू करावी यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मागणी केली होती. याबाबत ‘करंजाड, नामपूर चक्री बस सुरू करा’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित विभागाने दखल घेत विद्यार्थ्यांसाठी स्तब्ध झालेली बससेवा पूर्ववत केली.

गेल्या दोन वर्षांपासून शालेय शिक्षण कोरोनाच्या संकटकाळात ऑनलाईन सुरू होते. मात्र, ऑनलाईन शिक्षणाचा पुरता फज्जा उडाला होता. मोबाईलच्या अतिवापरामुळे नाहक पालकांचीच डोकेदुखी ठरली आहे. दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम झाल्याचे पालक वर्गाकडून बोलले जात आहे. बुधवारी (ता. १५) शाळा पुन्हा गजबजून गेल्या.

मात्र, शाळेत वेळेत पोहचण्यासाठी बससेवा सुरू होणे गरजेचे असल्याने बिजोटे (ता. बागलाण) येथील सरपंच पोपट जाधवसह शिष्टमंडळाने परिवहन मंडळाच्या आघार प्रमुखांची व बागलाणचे तहसिलदारांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बंद असलेली बससेवा पूर्ववत करण्यात यावी, यासंदर्भात निवेदन दिले.

बस गावात पोहचताच ग्रामस्थांकडून चालक, वाहकाचे औक्षण करून केले स्वागत
ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक

याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित विभागाने दखल घेऊन गावागावातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा पूर्ववत केली. करंजाड येथे सकाळी बस पोहचताच चालक व वाहकाचे नागरिकांकडून औक्षण करून सत्कार करण्यात आला. बस बिजोटे गावाच्या प्रवेशद्वारावर पोहचताच नागरिकांकडून चालक- वाहकाचे जंगी स्वागत केले. सरपंच पोपट जाधव, उपसरपंच अमृत जाधव, ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते बळीराम जाधव, नितीन जाधव व ग्रामस्थांनी स्वागत केले.

"विद्यालयात ये- जा करण्यासाठी विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत होते. ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करताच बस गावात पोहचली."

- पोपट जाधव, सरपंच, बिजोटे

"करंजाड- नामपूर चक्री बस अनेक महिन्यांपासून बंद होती. बस पुन्हा पूर्ववत झाल्याने आम्ही तरूण व ग्रामस्थांनी बस चालक व वाहकाचे औक्षण केले."

- केवळ देवरे, सामाजिक कार्यकर्त, करंजाड

बस गावात पोहचताच ग्रामस्थांकडून चालक, वाहकाचे औक्षण करून केले स्वागत
तुम्हाला माहिती आहे का? या व्यक्तीने चालवली होती पहिली एसटी बस...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com