
ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक
धुळे : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही. दरम्यान, स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आता ३० जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.
‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला हातभार लावण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने २०१८-१९ मध्ये सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजनेची घोषणा केली. ती लागू झाल्यानंतर विनाकार्ड प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलत देण्यात येणार नाही असेही महामंडळाने जाहीर केले आहे. कोरोनासह विविध कारणांनी या योजनेला मुदतवाढ मिळत गेली. मात्र, यावेळी दिलेली मुदतवाढ अंतिम असल्याचे महामंडळाने जाहीर केले आहे. महामंडळाच्या माध्यमातून साधारण २९ विविध सामाजिक घटकांना ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत लागू केली आहे. यात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजार असलेले रुग्ण, स्वातंत्र्यसैनिक, विविध पुरस्कारप्राप्त आदींना या सवलतीचा लाभ दिला जातो. दरम्यान, या सवलतीसाठी प्रवाशांना ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य करण्यात आले आहे.
हेही वाचा: गरोदर महिलांना सरकार करणार अर्थसाहाय्य; पाहा काय आहे ही योजना
६५ वर्षावरील नागरिक एसटी सवलतीसाठी पात्र आहेत. या नागरिकांनी एसटीच्या नियमानुसार नोंदणी करून कार्ड घेतल्यास त्यांना निम्म्या भाड्यात प्रवास करता येतो. महामंडळाने या ज्येष्ठ नागरिकांना सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक केले. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी यापूर्वी ३१ मेपर्यंत मुदत होती. दरम्यान, आता ही ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असल्याने १ जुलैपासून स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही.
हेही वाचा: तरुणांचा देश असलेला भारत ३० वर्षांत होईल म्हातारा!
Web Title: Smart Card Mandatory For Senior Citizens For Discounted Travel In Msrtc Bus
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..