Karmaveer Bundh
sakal
लासलगाव: सततच्या पावसात निफाड तालुक्यातील गोळेगाव येथे लोणगंगा नदी व गाढवे नाल्याच्या संगमावर असलेल्या कर्मवीर बंधाऱ्याला मोठे नुकसान झाले आहे. पाण्याच्या दाबामुळे बंधाऱ्याच्या भिंतीलगतचा भरावाचा भाग वाहून गेल्याने बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले. परिणामी बंधाऱ्यात साठवलेले सर्व पाणी एकाच वेळी ओसंडून वाहून गेले आहे. यामुळे बंधाऱ्याच्या समोरील रस्ता आणि पूलदेखील पाण्याच्या प्रवाहात पूर्णपणे वाहून गेले.