मालेगाव- चणकापूर धरणातून पिण्यासाठीचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचा मालेगावसह कसमादेतील लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना फायदा होणार आहे. मालेगाव महापालिकेच्या तळवाडे साठवण तलावात रविवारी (ता. ११) पहाटे पाणी पोहोचले. ८७ दशलक्ष घनफूट क्षमतेचा तलाव भरून घेण्यात येणार आहे.