Crime
sakal
कसबे सुकेणे (ता. निफाड): येथील कोकणगाव रोडवरील बेघर वस्ती परिसरात गुरुवारी (ता. ११) सायंकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, पोलिसांना दोन संशयितांना पकडण्यात यश आले आहे. सागर कैलास पवार (रा. बेरवाडी) हा शुक्रवारी (ता. १२) पोलिसांच्या ताब्यात आला. मात्र, मुख्य सूत्रधार विशाल धोंडिराम कापसे (रा. भेंडाळी) अद्याप फरारी असून, त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.