Crime
sakal
नाशिक: काठे गल्ली सिग्नल परिसरात गुरुवारी (ता. ६) मध्यरात्री ६.५ ग्रॅम मॅफेड्रॉनसह (एमडी) नामक अमली पदार्थासह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एक लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. श्रीरामपूरमधून (जि. अहिल्यानगर) हे अमली पदार्थ आणल्याचे पोलिस तपासातून समोर येत आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.