रात्रीचे जेवण उरकून बाप-लेक शेतावर झोपायला जायचे. सकाळी जनावरांना चारापाणी करून घरी परत यायचे. असा नित्यक्रम असताना, एका रात्री मुलगा शेतावर आलाच नाही. पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार केली. पोलिसांनी शोध घेतला; पण मागमूस लागेना. तांत्रिक तपासात त्याचे लोकेशन शेतातच मिळत गेले अन् सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी विश्वास पाटील यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन् तीच खरी ठरली...