Ketaki Mategaonkar
sakal
नाशिक: शनिवारी लाडक्या गणरायाला निरोप दिल्यावर रविवार (ता. ७)ची सायंकाळ गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या सुरांनी सुरेल बनली. जे गाणे ऐकत मोठी झाले, ते आशा भोसले यांनी गायलेले, ग. दि. माडगूळकर यांनी शब्दबद्ध केलेले व बाबूजींनी संगीतबद्ध केलेले ‘जिवलगा कधी येशील तू...’ याबरोबरच मराठी मालिकांची शीर्षक गीते, अभंग, नव्वदच्या दशकातील गाणी अशा हिंदी- मराठी गीतांच्या एकाहून एक सरस मेजवानीने नाशिककर रसिक तृप्त झाले. निमित्त होते, ‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट केतकी माटेगावकर’ या विशेष कार्यक्रमाचे!