Kharif Crops
sakal
खेडलेझुंगे: गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, मका, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांना पावसाचा प्रचंड फटका बसला आहे. शेतात पाणी साचून पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. जमिनीतील पोषक घटक वाहून गेल्याने पिकांची वाढ खुंटली असून, ती पिवळी पडू लागली आहेत.