Sunita Binner
sakal
सिन्नर: मुक्या जनावरांना जीव लावला, तर ते आपल्या मालकाशी किती प्रामाणिक राहतात, याची अनेक उदाहरणे आपण ऐकली आहेत असाच प्रकार खापराळे येथे घडला. मालकिणीवर तरस हल्ला करत असल्याचे पाहून चवताळलेल्या म्हशीने धाव घेत तरसाला जोरदार धडक दिली अन् मालकिण व तिच्या मुलीचा प्राण वाचविल्याची सुखद घटना खापराळे (ता. सिन्नर) येथे घडली. म्हशीच्या धडकेने तरसाचा जागीच तडफडून मृत्यू झाला. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा असून, म्हशीच्या मालरिणीवर हल्ला करणे तरसाला चांगलेच महागात पडले.