Kharif Crop Loans : खरीप पीक कर्ज वाटप यंदा संकटात? जिल्हा बॅंकेची वसुली ठप्प; अवकाळीचाही फटका

Crop Loan
Crop Loanesakal

नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेले असतानाही पीक कर्ज वाटपात आघाडीवर असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून यंदाचे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप संकटात सापडण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्या झालेल्या बि-हाड आंदोलनानंतर, पालकमंत्री दादा भुसे यांच्या त्या पत्रानंतर बँकेची थकबाकी वसुली ठप्प झालेली असतानाच, जिल्ह्याला अवकाळीचा फटका बसला. त्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाकडून वसुली कशी करायची असा प्रश्न बॅंकेसमोर असल्याने वसुली कासवगतीने सुरू आहे.

थकबाकी वसुली नसल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज कसे वाटायचे?, असा प्रश्न बॅंक प्रशासनासमोर आहे. (Kharif crop loan distribution in crisis this year Zilla Bank recovery stalled unseasonal rain hit crop nashik news)

जानेवारी महिन्यात जिल्हा बॅंकेच्यावतीने सुरू असलेल्या लिलाव प्रक्रीया विरोधात पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने गत महिन्यात बिऱ्हाड आंदोलन केले.

या आंदोलनानंतर, पालकमंत्री भुसे यांच्या सूचनेनुसार जिल्हा बॅंकेने विविध कार्यकारी सोसायट्यांकडून थकबाकीदार सभासदांवर ६ टक्के, ७ टक्के व ८ टक्के दराने होणारे सरळव्याजाची आकारणी करून तशी माहिती मागविली.

या आदेशानुसार बँकेने वि. का. सोसायट्यांना पत्र देत माहिती मागविली देखील. परंतु, वि.का. सोसायटयांकडून सदर माहिती देण्यास टाळाटाळ झाली. दुसरीकडे मात्र, बॅंकेची वसुली बंद पडली असून आर्थिक फटका बसत आहे. सदर पत्र मिळाल्यानंतर बॅंकेची थकबाकी वसुली जवळपास ठप्प झालेली आहे.

२० मार्च २०२३ अखेर बॅंकेची केवळ ७.३८ टक्के वसुली झाली आहे. गतवर्षी वसुलीचे हेच प्रमाण २४ टक्के होते. जुनी थकबाकी वसुली करण्याचे प्रमाण संथगतीने सुरू असतानाच, जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी पुन्हा संकटात सापडला. या परिस्थितीत बॅंकेकडून वसुली कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Crop Loan
Nashik News: आजीआजोबांच्या आठवणींत नातवंडांचे दातृत्व; सप्तशृंगी चरणी 5 लाखांचे दान

त्यामुळे बॅंकेने वसुली मोहीम काही प्रमाणात गुंडाळून ठेवल्याचे बोलले जात आहे. नियमित थकबाकीवर देखील याचा परिणाम झाला असल्याकारणाने वसुलीचे प्रमाण घटले आहे. परिणामी बॅंकेची मार्च २०२३ अखेर वसुली घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वसुली घटल्यामुळे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपावरही परिणाम होण्याची चिन्हे आहे. नियमित अन थकबाकी वसुली झाल्यानंतर यातूनच बॅक शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देत असते. मात्र, नियमित वसुली देखील रखडलेले असल्याने, वसुली झालेली नाही. वसुली नसल्याने पीक कर्ज कसे द्यायचे हा प्रश्न बॅंक प्रशासनास सतावत आहे. गतवर्षी (सन २०२२-२३) खरीप व रब्बी हंगामासाठी ५२ हजार शेतकऱ्यांना४६४ कोटींचे पीक कर्ज वाटप झाले होते. साधारण एक एप्रिल २०२३ पासून खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप सुरू होत असते. परंतु, वसुली नसल्याने हे पीक कर्ज शेतकऱ्यांना यंदा मिळण्याची शक्यता कमी आहे.

Crop Loan
Floriculture : जानोरीच्या फुलशेतीची परदेशी पाहुण्यांना भुरळ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com