Kharif Sowing: राज्यात पेरणीच्या तुलनेत पीकविम्याचे क्षेत्र 80 टक्के; कोल्हापूर विभाग आघाडीवर

Kharif sowing
Kharif sowingesakal

Kharif Sowing : राज्यात यंदाच्या खरिपामध्ये आतापर्यंत सरासरी एक कोटी ४२ लाख दोन हजार ३१८ हेक्टरपैकी ८७ टक्के म्हणजे, एक कोटी २३ लाख ७५ हजार ९२० हेक्टरवर पेरण्या उरकल्या आहेत.

पेरणी क्षेत्रापैकी ८० टक्के म्हणजे, ९९ लाख १७ हजार २२४ हेक्टरवरील पिकांचा शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान पीकविमा योजनेतील सहभाग एक रुपयांमध्ये करण्याची योजना राज्य सरकारने जाहीर करूनही अगदी पंधरा दिवसांपर्यंत योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होती.

मात्र कृषी विभागाच्या प्रयत्नातून गेल्या वर्षी योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत आजअखेर सहभागी शेतकऱ्यांची संख्या १५५.७४ टक्क्यांहून अधिक आहे. (Kharif Sowing 80 percent of crop insurance area compared to sowing in state Kolhapur Division in lead nashik)

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागातील गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत एक हजार ३४८ टक्के अधिक शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झालेत.

कोल्हापूर विभागातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र आठ लाख २८ हजार १७६ हेक्टर असून, त्यापैकी आतापर्यंत चार लाख ५४ हजार ८३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

त्यापैकी एक लाख १९ हजार ८४१ हेक्टरवरील पिकांचा शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. योजनेतील गेल्या वर्षीच्या सहभागाच्या तुलनेत आता सातारा जिल्ह्यातील तीन हजार ५५०, सांगली जिल्ह्यातील एक हजार १०२, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ५८२.८६ टक्के शेतकऱ्यांचा योजनेत सहभाग मिळविण्यात कृषी विभागाने यश मिळविले.

दरम्यान, राज्यातील प्रमुख पीकनिहाय सर्वसाधारण क्षेत्र आणि प्रत्यक्ष आतापर्यंत पेरणी झालेले क्षेत्र अनुक्रमे हेक्टरमध्ये असे : भात- १५ लाख आठ हजार ३७४ - नऊ लाख ३१ हजार ८३२, ज्वारी- दोन लाख ८८ हजार ६१५ - ९८ हजार ६००, बाजरी- सहा लाख ६९ हजार ८९ - दोन लाख ५६ हजार १४५, रागी- ७८ हजार १४९ - ३६ हजार ८२६, मका- आठ लाख ८५ हजार ६०८- सात लाख ३९ हजार ९६२,

इतर तृणधान्य- ४० हजार ४४५ - १७ हजार ८०५, तूर- १२ लाख ९५ हजार ५१६ - दहा लाख २१ हजार ५८, मूग- तीन लाख ९३ हजार ९५७ - एक लाख ५० हजार ४९४, उडीद- तीन लाख ७० हजार २५२ - एक लाख ९६ हजार ४२२, इतर कडधान्ये- ७८ हजार ८४५ - ४५ हजार ५७२, भुईमूग- एक लाख ९१ हजार ५७५ - एक लाख १३ हजार ७३३,

तीळ- १५ हजार १६२ - तीन हजार ८३३, कारळे- १२ हजार ४६० - तीन हजार ७७४, सूर्यफूल- १३ हजार ७८० - ९५३, सोयाबीन- ४१ लाख ४९ हजार ९१२ - ४६ लाख ७२ हजार ४१८, इतर गळीत धान्ये - नऊ हजार ४५२ - दोन हजार १६२, कापूस- ४२ लाख एक हजार १२८- ४० लाख ८४ हजार ३३०.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kharif sowing
Nashik BEd DEd Job : बी. एड., डी. एड. उमेदवारांसाठी गुड न्यूज! नाशिक विभागात 8 हजार जागा होणार रिक्त

४८ हजार २५८ कोटींचे विमा संरक्षण

शेतकऱ्यांनी आजपर्यंत पीकविमा योजनेत सहभाग घेत आपल्या पिकांना ४८ हजार २५८ कोटी १३ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले आहे. एक रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी दीड कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे.

राज्य सरकार चार हजार २८८ कोटी ८० लाख, तर केंद्र सरकार दोन हजार ९२६ कोटी ४७ लाख असा एकूण सात हजार २२६ कोटी ७८ लाख रुपयांचा विमा हफ्ता कंपन्यांना देणार आहे. गेल्या वर्षी पीकविमा योजनेत राज्यातील ९६ लाख ६२ हजार २६१ शेतकरी सहभागी झाले होते.

आजअखेर राज्यातील एक कोटी ५० लाख ४७ हजार ७९८ शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या पाच लाख चार हजार २५१, तर बिगरकर्जदार शेतकऱ्यांची संख्या एक कोटी ४५ लाख ४३ हजार ३५७ इतकी आहे.

पीकविमा योजनेत चार लाख १७ हजार ३८४ शेतकरी बँकेच्या, एक लाख १६ हजार तीन शेतकरी जिल्हा बँकांच्या, एक कोटी ४२ लाख दोन हजार १३५ शेतकरी आपले सरकार केंद्राच्या, एक लाख ९४ हजार ७३९ शेतकरी स्वतःच्या मोबाईलच्या, तर एक लाख १७ हजार ५३७ शेतकरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून सहभागी झाले आहेत.

पीकविमा योजनेसाठी ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने या कालावधीत आता राज्यातील पेरणी झालेले संपूर्ण क्षेत्र पीकविमा योजनेत आणण्याचे आव्हान कृषी विभागाला पेलावे लागणार आहे.

विभागनिहाय पीकविम्याची स्थिती

विभागाचे नाव शेतकरी संख्या विमा संरक्षित क्षेत्र हेक्टर

कोकण एक लाख ७३ हजार ९५४ ९० हजार ९५१

नाशिक ११ लाख १३ हजार ३५८ नऊ लाख ६५ हजार १८६

पुणे १६ लाख ३६ हजार ३८० दहा लाख ५५ हजार ३०२

कोल्हापूर चार लाख ७६ हजार १८७ दोन लाख १९ हजार ८४१

औरंगाबाद ३८ लाख ३० हजार ७८९ १७ लाख ५४ हजार ५१९

लातूर ३९ लाख ५९ हजार ३७० २६ लाख ७५ हजार ७७५

अमरावती २७ लाख ६० हजार १९३ २२ लाख ७८ हजार २९८

नागपूर दहा लाख ९७ हजार ५६७ आठ लाख ७७ हजार ३५२

Kharif sowing
Sakal Impact : अन् सिग्नलवरचे ‘सेंकद’ दिसू लागले; वाहनचालकांकडून समाधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com