Nashik BEd DEd Job : बी. एड., डी. एड. उमेदवारांसाठी गुड न्यूज! नाशिक विभागात 8 हजार जागा होणार रिक्त

Teacher Recruitment
Teacher Recruitmentesakal

Nashik Bed Ded Job : नाशिक विभागातील बी.एड. आणि डी. एड. झालेल्या उमेदवारांसाठी लवकरच गुड न्यूज येणार आहे. महिनाभरात संचमान्यतेनंतर किमान साडेसात ते आठ हजार जागा नाशिक विभागात रिक्त होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिली.

त्यामुळे बी.एड. व डी.एड. होणाऱ्या भावी शिक्षकांसाठी यापुढे नोकरीच्या संधी वाढणार आहेत.

अनेक वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. शिवाय पवित्र पोर्टल २०१७ लागू झाल्यापासून शिक्षक भरती झालेली नाही. (Bed Ded Job 8 thousand seats will be vacant in Nashik division news)

त्यामुळे अनुदानित शाळेतील शिक्षकांवर कामाचा मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. इंग्रजी माध्यमाकडे मुलांचा शिकण्याचा कल असल्यामुळे अनेक तुकड्या सध्या कमी होत आहेत.

शिवाय लाखोने डी. एड. व बी. एड. झालेले भावी शिक्षक सध्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. नाशिक विभागात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये किमान आठ हजार जागा रिक्त होतील, असा अंदाज शिक्षण उपसंचालकांनी व्यक्त केला आहे. यामुळे होणाऱ्या संभाव्य इच्छुक शिक्षकांना सुगीचे दिवस येणार आहेत.

जिल्हा परिषदेसह खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक विभागात जागा रिक्त होण्याचे प्रमाण अधिक आहे, तर माध्यमिक स्तरावर मध्यम आहे. निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागी अनेक संस्थांनी मानधन तत्त्वावर शिक्षक भरले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Teacher Recruitment
YCMOU Admission : ‘मुक्‍त’च्‍या प्रवेशासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ; अभ्यासकेंद्र मान्‍यतेसाठी 26 पर्यंत मुदत

अनेक वर्षांपासून खुल्या पद्धतीने शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत या रिक्त जागा भरून निघतील, असा अंदाज शिक्षणतज्ज्ञही व्यक्त करीत आहेत. डी. एड. आणि बी. एड. कॉलेज विद्यार्थी न मिळाल्याने ओस पडले आहेत. काही डी. एड. व बी. एड. कॉलेज बंदही पडले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आता डी. एड. आणि बी. एड.च्या शिक्षणालाही चांगले दिवस येतील, अशा भावना संस्थाचालकांनी व्यक्त केल्या.

"भविष्यात डी. एड. आणि बी. एड. कॉलेजला चांगले दिवस येतील. १९९० ते ९५ च्यादरम्यान शिक्षण क्षेत्रातील अध्ययनाला चांगले दिवस होते. तेच दिवस यापुढे येतील. शिवाय किमान आठ हजार जागा नाशिक विभागात रिक्त होणार असल्याचा आमचा अंदाज आहे." - डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग

"शिक्षण क्षेत्रात रोजगाराची उपलब्धता झाल्यावर मुलांच्या अध्ययनात गुणवत्ता येणार आहे. शिवाय सध्या कार्यरत शिक्षकांवर असलेला कामाचा वर्कलोड कमी होईल. प्राथमिक विभागात शिक्षक भरती होणे प्राधान्याने गरजेचे आहे. एकूणच शिक्षण क्षेत्राला ऊर्जितावस्था येईल." - हरबिर चौधरी, शिक्षणतज्ज्ञ

Teacher Recruitment
Nashik Teacher Recruitment : जिल्ह्यात शिक्षकांच्या 1100 जागा रिक्त; बिगरआदिवासी तालुक्यांना मिळणार दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com