NMG
sakal
नाशिक रोड: भुसावळ विभागाने मालवाहतूक क्षेत्रात आणखी एक मोलाची कामगिरी बजावली आहे. खेरवाडी रेल्वेस्थानकावरून प्रथमच एनएमजी ऑटोमोबाइल रॅक लोडिंग यशस्वीरीत्या सुरू झाले आहे. ही कामगिरी नाशिक रोड आणि देवळाली येथील यशस्वी लोडिंगनंतरची पुढची महत्त्वपूर्ण पायरी ठरली आहे. या उपक्रमामुळे विभागाची मालवाहतूक क्षमता अधिक बळकट झाली असून, ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.