Prashant Damle
sakal
नाशिक: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे दरवर्षी मराठी रंगभूमी दिनानिमित्त दिले जाणारे पुरस्कार सोमवारी (ता. २७) जाहीर करण्यात आले. यात दिग्दर्शक सुरेश गायधनी, अभिनेते अरुण भावसार, अभिनेत्री लक्ष्मी पिंपळे यांचा समावेश असून, पुरस्कार वितरण सोहळा ता. ५ नोव्हेंबरला महाकवी कालिदास कलामंदिरात दुपारी बाराला होईल.