खुटवडनगर, डीजीपीनगर रात्रभर अंधारात; वीज कंपनीचा भोंगळ कारभार

power cut Latest Marathi news
power cut Latest Marathi newsesakal

नाशिक : शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे (Rain) परिसरातील अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. परंतु, शहरातील खुटवडनगर, डीजीपीनगर, मुरारीनगर, महालक्ष्मीनगर, माऊली लॉन्स या परिसरात शुक्रवारी (ता. १५) रात्री नऊच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा (Power cut) शनिवार (ता. १६) पहाटे तीनच्या सुमारास सुरळीत झाला.

वीज वितरण कंपनीच्या (MSEDCL) या भोंगळ कारभारामुळे या परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, वीज तारा तुटल्याने सदरचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात आले. (Khutwad Nagar DGP nagar in darkness overnight Mismanagement of MSEDCL Nashik latest marathi news)

गेल्या आठवडाभरापासून आठवडाभरापासून नाशिक शहर परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शहर- जिल्हयात बहुतांशी ठिकाणी पावसामुळे वृक्ष उन्मळून पडले. काही ठिकाणी वीज तारा आणि रोहित्रांवरच वृक्ष उन्मळून पडल्याने तारा तुटून अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित झाला होता.

नाशिक शहरातही अनेक ठिकाणी अशा दुर्घटना घडल्या. त्यामुळे शहरात सातत्याने अनेक भागात वीजपुरवठा खंडित होतो आहे. सतत विजेचा सुरू असलेल्या लपंडावामुळे मात्र नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.

शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. वीज वितरण कंपनीच्या विभाग दोनमध्ये समाविष्ट असलेल्या कामटवाडा शिवारातील खुटवडनगर, मुरारीनगर, वावरेनगर, मुरारीनगर, डीजीपीनगर, वृंदावननगर, माऊली लॉन्स, महालक्ष्मीनगर या परिसरातील वीज प्रवाह शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास खंडित झाला.

सदरचा वीजपुरवठा सुरू होण्यासाठी तब्बल सहा तासांचा कालावधी लागला. शनिवारी (ता.१६) पहाटे तीनच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. सहा तास वीज नसल्याने सदरील परिसरात अंधारात बुडाला होता.

रात्रीची वेळ, पावसाची रिपरिपीमुळे परिसरात डासांचा प्रादूर्भाव वाढल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, विभाग दोनमधील काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने सदरील वीज पुरवठा खंडित झाल्याचे वीज वितरण कंपनीच्या तक्रार विभागाकडून सांगण्यात आले.

power cut Latest Marathi news
Zarif Baba Murder : मृत बाबाच्या पत्नीने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

पावसाळापूर्व कामांबाबत शंका

वीज वितरण कंपनीकडून पावसाळ्यापूर्वी कामे केली जातात. यात धोकादायक असणारी वृक्षांची छाटणी, वीज तारांवर कोसळू शकतील अशा झाडांच्या फांद्या छाटणी, कुठेही वीज प्रवाह उतरणार याची दक्षता घेताना रोहित्र, विजेचे खांब याठिकाणी दुरुस्ती करणे आदी कामे केली जातात.

असे असतानाही पावसाळ्यात झाडांच्या फांद्या तुटून वीजतारा तुटणे यासारख्या घटना घडून वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे वीज कंपनीकडून पावसाळापूर्व कामे होतात की नाही याबाबतच शंका उपस्थित होऊ लागली आहे.

power cut Latest Marathi news
खड्डेयुक्त रस्त्यांचे ‘माजी नगरसेवक पंक्चर सेंटर’ नामकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com