Zarif Baba Murder : मृत बाबाच्या पत्नीने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

 Zarif Chisti Baba murder case latest news
Zarif Chisti Baba murder case latest newsesakal

नाशिक : निर्वासित अफगाण सुफी धर्मगुरू जरीफबाबा यांचा खून (Murder) झाल्यानंतर त्यांच्या पत्नी तरिना यांनी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील (Superintendent of Police sachin patil) यांची भेट घेत त्यांच्यासमोर कैफियत मांडली.

अधीक्षक पाटील यांनी, जरीफबाबा खून प्रकरणातील तपासाची माहिती देत संशयितांना अटक केल्याचे सांगितले. दरम्यान, अफगाण दूतावासाकडून होत असलेल्या व्हिसाच्या समस्येमुळे जरीफबाबांचा दफनविधी नाशिकमध्ये होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निर्वासित असलेल्या जरीफबाबाकडे कोट्यवधींची रक्कम आली कुठून? हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्‍न असून, मनिलॉड्रिंगच्या दिशेनेही या प्रकरणाचा तपास करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Zarif Baba Murder case Dead Baba's wife meets Superintendent of Police sachin patil nashik latest Marathi news)

निर्वासित अफगाणी सुफी धर्मगुरू जरीफबाबा यांचा गेल्या ५ जुलैला रात्री चिंचोडी (ता. येवला) एमआयडीसीत गोळी झाडून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे.

दोघे फरारी असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस मागावर आहेत. जरीफबाबा यांच्या पत्नी तरिना या गरोदर असून, या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची तरीना यांनी आडगाव येथील अधीक्षक कार्यालयात भेट घेतली.

अधीक्षक पाटील यांनी जरीफबाबा यांच्या खून प्रकरणात सुरू असलेल्या पोलिस तपासाची माहिती दिली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांचा सहभाग व फरारी दोघांची माहिती दिली.

ही घटना मालमत्तेच्याच वादातून झाल्याचे सांगत, संशयितांना कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांकडून आवश्‍यक पुरावे व तांत्रिक माहिती संकलन करून ते न्यायालयात सादर केले जातील, असे आश्‍वासनही दिले.

 Zarif Chisti Baba murder case latest news
Nashik : शहरात 24 तास लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय

व्हिसामुळे विलंब

जरीफबाबा यांचा मृतदेह अद्याप जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात आहे. जरीफबाबा व त्यांच्या पत्नी तरिना यांच्या नातलगांना भारतात यायचे आहे. मात्र अफगाण दुतावासाकडून व्हिसाबाबत अडचणी येत आहेत.

त्यामुळे त्यांना जरीफबाबा यांचा मृतदेह अफगाणिस्तानाला नेता येत नाही. परिणामी, त्यांच्यासमोर दफनविधीला विलंब होत आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील हे भारतीय व अफगाण दूतावासाच्या संपर्कात आहेत. मात्र, व्हिसाची समस्या न सुटल्यास जरीफबाबा यांचा दफनविधी नाशिकमध्ये होण्याचीही शक्यता आहे.

विशेष पथकामार्फत चौकशी करा : शेलार

जरीफबाबाच्या खून प्रकरणाचा विशेष तपास पथकाकडे देत चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. राज्याचे पोलिस महासंचालक डॉ. रजनीश सेठ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

श्री. शेलार यांनी दिलेल्या पत्रानुसार, जरीफबाबा निर्वासित असतानाही त्यांनी राज्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता त्यांच्या नजीकच्या लोकांच्या नावावर खरेदी केली. परंतु त्यासाठी त्यांना पैसा कोठून उपलब्ध झाला? रोख स्वरूपात पैसा कसा उपलब्ध झाला? यासाठी त्यांना कोणाची मदत होत होती का?

ही बेनामी संपत्ती करण्यामागील हेतू काय, ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिणामकारक ठरू शकते. मनिलॉड्रिंगच्या दिशेनेही या घटनेचा तपास होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी विशेष तपास पथकामार्फत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 Zarif Chisti Baba murder case latest news
Nashik : पाणीपट्टीची अवघी दीड टक्का वसुली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com