Crime
sakal
नाशिक: व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी गेलेल्या जेलरोड येथील युवकास अवैध सावकाराने कारमध्ये डांबून अपहरण केला. त्यानंतर त्यास एकलहरे येथे नेत गावठी कट्ट्याचा धाक दाखवून साडेतीन लाखांच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उपनगर पोलिसात सावकार कैलास मैद, रवी सोळशे व त्यांच्या कारचा चालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.