नाशिक: किकवी पेयजल प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वनजमीन आणि खासगी शेतजमिनींच्या संपादन प्रक्रियेला गती मिळाली असून, येत्या वर्षाअखेरीस प्रत्यक्ष उभारणीस सुरुवात होणार आहे. जलसंपदा विभागाकडून वनजमिनीचे भराव शुल्क (एनपीव्ही) अदा होताच काम सुरू करण्यात येईल.