जुने नाशिक: तपोवन आणि टाकळी रोड परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी उघडकीस आल्या. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना द्वारका परिसरातील शंकरनगर हाउसिंग सोसायटीत घडली.