Kinnar Akhada
sakal
नाशिक: आगामी सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री काळाराम मंदिर परिसर, त्र्यंबकेश्वर परिसर या ठिकाणी किन्नर आखाड्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. पौराणिकरीत्या अत्यंत महत्त्वाच्या या प्रदेशात किन्नरांच्या आगमनामुळे धार्मिक वातावरण अधिकच भारले असून, पंचवटीचा आध्यात्मिक इतिहास नव्या अर्थाने उजेडात येत आहे. किन्नरांना म्हणजे उपदेवतांना खुद्द प्रभू श्रीरामांचे अभय असल्याने त्यांचा आखाडा सिंहस्थ- कुंभमेळ्यात श्रेष्ठ आखाडा मानला जातो.